सचिव - महाराष्ट्र प्रदेश ( आरपीआय ) श्रमिक ब्रिगेड |
संस्थापक अध्यक्ष - तथ योद्धा |
संस्थापक - तथ्य उद्योग समूह

Tushar Tanaji Kamble - तुषार तानाजी कांबळे

Gallery

About Us

* साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव ठाणे व महानगरपालिका ठाणे यांच्याकडून सन्मान

ठाणे / प्रतिनिधी :- साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०५ व्या जयंती उत्सवाच्या भव्य सोहळ्यात ठाणे शहरात प्रभावशाली युवा व बहुआयामी सामाजिक व राजकीय नेते, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) श्रमिक ब्रिगेड महाराष्ट्र प्रदेश सचिव तथा तथ्य योद्धा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तुषार तानाजी कांबळे यांना “समाजगौरव" सन्मान देऊन गौरविण्यात आले. हा सन्मान ठाणे महानगरपालिका उपायुक्त शंकर पाटोळे यांच्या हस्ते तसेच माजी मंत्री आमदार जितेंद्र आव्हाड, कुसुमताई बाबासाहेब गोखले, समितीचे पदाधिकारी अध्यक्षा अनिता मोटे, कार्याध्यक्ष नंदाताई सोनावणे, सचिव मिनाक्षी शिरसाठ यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला.

यावेळी मातंग समाज नेते अभंग शिंदे उपस्थित होते. तर शिवलहू सेना महाराष्ट्र प्रदेश समन्वयक संतोष सगट, पत्रकार योगेश नवगिरे, शिवसेनिक दीपक आवारे यांचे विशेष सहकार्य लाभले.

या सन्मानाबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करतांना तुषार तानाजी कांबळे म्हणाले की, हा पुरस्कार माझा नसून तो संपूर्ण समाजाचा आहे. मातंग समाजाच्या ऐक्य, संघर्ष आणि प्रगतीसाठी हे प्रेरणादायी यश आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा प्रकाश आम्हाला नेहमी मार्गदर्शक ठरेल. या भव्य जयंती उत्सवात समाजातील अनेक कार्यकर्ते, साहित्यिक, कलाकार, विचारवंत तसेच नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. संपूर्ण ठाणे भगव्या तेजाने उजळले व सामाजिक ऐक्याची जाणीव सर्वांना अनुभवता आली.

युवा नेते तुषार कांबळे यांना “समाजगौरव" पुरस्कार

Videos Section

Anchor - * दि. 7 मार्च 2024 रोजी जिल्हा सातारा, तालुका मान येथील मोही या गावात एका भटक्या विमुक्त जाती आणि जमातीमधील एका महिला भगिनींचा तेथील असलेल्या गावगुंड प्रवृत्तीच्या काही हरामखोर बाडगुळणी त्या माता भगिनीच्या घरात घुसून विनयभंग करण्यात व 'त्या' महिलेच्या पतीस (नवऱ्याला) एका बंद खोलीत डांबून मारण्यात आले. सदरील घटनेचा निषेध व्यक्त करीत 'त्या' महिलेच्या घरचे व नातेवाईक हे न्याय मागण्यासाठी पोलिस स्टेशनला गेले असता, पोलिस प्रशासनाने त्या गावगुंडांशी संगनमत करून सदरील घडलेल्या गोष्टीकडे लक्ष ना देता, पिडीत कुटुंबाला दबावाखाली घेत तक्रार नोंदवून घेण्याऐवजी पोलिस स्टेशनमधून हाकलून दिले असता, पिडीत कुटुंबाने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) मातंग आघाडीच्या सातारा जिल्हा कार्याध्यक्ष नवनाथ लोखंडे व युवक माण तालुका अध्यक्ष कुणाल लोखंडे यांच्याकडे आम्हाला आपण न्याय मिळवून द्यावा ही विनंती केली. https://youtu.be/rIHTNW6SwJU?si=rt9002ZFOfMF2QOL

आरपीआय मातंग आघाडी शिष्टमंडळाचा दणका

तुषार कांबळे यांची आरपीआय सचिवपदी नियुक्ती

Anchor - * दि. १५ जून २०२४ रोजी पंडित जवाहरलाल नेहरू नाट्यगृह पुणे येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) श्रमिक ब्रिगेड कार्यकर्ता मेळावा व पद नियुक्ती समारंभ संपन्न झाला. या कार्यक्रमांमध्ये तुषार तानाजी कांबळे यांची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) श्रमिक ब्रिगेड महाराष्ट्र प्रदेश सचिवपदी नियुक्ती राष्ट्रीय कार्याध्यक्ष आरपीआय श्रमिक ब्रिगेड तथा माजी आमदार ऍंड. एल. टी. सावंत व श्रमिक ब्रिगेड महाराष्ट्र राज्य अध्यक्ष डॉं. सतीश केदारी यांच्या हस्ते करण्यात आली. https://youtu.be/r-D4fR7nUqk?si=YvzHyWxV_PL1PEhy

Contact Tushar Tanaji Kamble